मित्राच्या गर्लफ्रेंडला घरी बोलावून दारु पाजली, त्यानंतर केला बलात्कार!(Nagpur-Rep) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, March 31, 2021

मित्राच्या गर्लफ्रेंडला घरी बोलावून दारु पाजली, त्यानंतर केला बलात्कार!(Nagpur-Rep)

     मित्राच्या गर्लफ्रेंडला घरी बोलावून दारु पाजली, त्यानंतर केला बलात्कार

                                                             (छायाचित्रे संग्रहित)  

नागपूर | नागपूरमध्ये अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. नैराश्यातून बाहेर काढायच्या बहाण्याने मित्राच्या गर्लफ्रेंडवरच एकाने बलात्कार केल्याची लाजीरवाणी घटना समोर आली आहे. आरोपी रोमिओ गोडबोले या तरूणाने दारू पाजून संबधित तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांना ही माहिती मिळताच आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नागपूर शहरातील अंजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही बलात्काराची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी रोमिओ हा पीडित तरुणीच्या प्रियकराचा मित्र असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. पीडित तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर अंजनी पोलिसांनी आरोपी रोमिओ गोडबोलेला बेड्या ठोकल्या आहेत.

पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी तरूणाने नैराश्येतून बाहेर काढण्यासाठी मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर त्याने पीडित तरुणीशी जवळीक साधली आणि अत्याचार केला असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

दरम्यान, पीडित तरुणी आरोपी रोमिओला एक वर्षांपासून ओळखते. पीडिता ही विद्यार्थिनी असून ती शिक्षणासाठी नागपूरमध्ये राहत आहे. ती नागपूरच्या अंजनी पोलीस ठाण्याच्या परिसरात भाड्याच्या खोलीत राहते. या घटनेमुळं पीडिता मानसिकरित्या अजूनच खचली आहे. घटनेनंतर तिने तात्काळ अंजनी पोलीस ठाण्यात जाऊन आरोपी रोमिओ गोडबोले विरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल करत लगेचच आरोपीला अटक केली आहे.


Post Top Ad

-->