दोन करोनाबाधित वृद्धांची आत्महत्या; एकाने घरी, दुसऱ्याने मेडिकलमध्ये गळफास घेतला( Nagpur-Sucide) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, March 31, 2021

दोन करोनाबाधित वृद्धांची आत्महत्या; एकाने घरी, दुसऱ्याने मेडिकलमध्ये गळफास घेतला( Nagpur-Sucide)

दोन करोनाबाधित वृद्धांची आत्महत्या; एकाने घरी, दुसऱ्याने मेडिकलमध्ये गळफास घेतला                                


 (छायाचित्रे संग्रहित)  

नागपूर : शहरातील दोन करोनाबाधित वृद्धांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यापैकी एक रुग्ण गृहविलगीकरणात होता, तर दुसऱ्याने मेडिकलच्या स्वच्छतागृहात गळफास घेतला.

पुरुषोत्तम अप्पाजी गजभिये (८१) रा. रामबाग, इमामवाडा आणि वसंत कुटे (६८) रा. ८५, प्लॉट परिसर, अजनी असे दोन्ही आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. पुरुषोत्तम यांना २५ मार्चला करोना असल्याचे कळले. त्यांना  मेडिकलच्या कोविड रुग्णालयात दाखल केले. ते ऑक्सिजनवर  होते. धूलिवंदनाच्या दिवशी पुरुषोत्तम हे स्वच्छतागृहात गेले. बराच वेळ ते परत आले नाहीत. सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास या वॉर्डात स्वच्छता कर्मचारी  गेला असता त्याला दार आतून बंद  असल्याचे दिसले.  दार ठोकल्यावरही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने सहकाऱ्यासह मिळून दार तोडले. त्यांना येथे पुरुषोत्तम यांनी ऑक्सिजनच्या पाईपने  गळफास घेतल्याचे दिसले. हा प्रकार कळताच तेथे खळबळ उडाली. तातडीने वरिष्ठांसह पोलिसांना सूचना केली गेली. दुसऱ्या घटनेत वसंत कुटे यांना करोना असल्याचे २६ मार्चला निदान झाले. ते गृह विलगीकरणात उपचार घेत होते. त्यांना मूत्रखडय़ाचा त्रास वाढला होता.  हा त्रास असह्य़ होत असल्याने त्यांनी गळफास घेतल्याचा अंदाज कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केल्याची माहिती अजनी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय चौधरी यांनी दिली.

मानसिक समुपदेशन गरजेचे

हे रुग्ण नैराश्यात जाऊ नये म्हणून तज्ज्ञांकडून समुपदेशन आवश्यक आहे. परंतु रुग्णसंख्या बघता महापालिका कसे नियोजन करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे. रुग्णालयांवरही डॉक्टरांचा ताण वाढल्याने तेथेही समुपदेशनात समस्या उद्भवत आहेत.

आत्महत्येची माहिती कळताच मेडिकलचे सर्व वरिष्ठ अधिकारी तेथे पोहचले. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाईल.


Post Top Ad

-->