शिवसेनेकडून नव्या प्रवक्त्यांच्या नावांची घोषणा, 'या' 16 जणांना मिळाली संधी
शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांच्याकडे शिवसेनेने मुख्य प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवली आहे. भाजपसोबत बेबनाव झाल्यानंतर अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे त्यांच्याकडे सध्या प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच काही नवीन नावांची देखील यामध्ये वर्णी लागली आहे.
कोणा कोणाची लागली प्रवक्तेपदी वर्णी?
संजय राऊत - राज्यसभा खासदार - मुख्य प्रवक्ते
अरविंद सावंत - खासदार - मुख्य प्रवक्ते
प्रियंका चतुर्वेदी - राज्यसभा खासदार
अॅड. अनिल परब - परिवहन मंत्री
सचिन अहिर - शिवसेना उपनेते (नवीन निवड)
सुनील प्रभू - आमदार (मुंबई)
प्रताप सरनाईक - आमदार (ठाणे)
भास्कर जाधव - आमदार (रत्नागिरी) (नवीन निवड)
अंबादास दानवे - विधानपरिषद आमदार (औरंगाबाद-जालना) (नवीन निवड)
मनिषा कायंदे - विधानपरिषद आमदार (नवीन निवड)
किशोरी पेडणेकर - महापौर (मुंबई)
शीतल म्हात्रे - नगरसेविका (मुंबई) (नवीन निवड)
डॉ. शुभा राऊळ - माजी महापौर (मुंबई) (नवीन निवड)
किशोर कान्हेरे (नागपूर) (नवीन निवड)
संजना घाडी (नवीन निवड)
आनंद दुबे (मुंबई) (नवीन निवड)