(छायाचित्रे संग्रहित)
सरकारी तेल कंपन्यांकडून आज दुसऱ्या दिवशी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत. आज पेट्रोल २१ पैसे आणि डिझेल २० पैशांनी स्वस्त झाले आहे. त्यामळु सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात होणाऱ्या घसरणीमुळे सामान्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळत आहे. आज मुंबईत पेट्रोलचा दर ९७.१९ रुपये तर डिझेल ८८.२० रुपये प्रति लीटर झाले आहे. परंतु इतर राज्यांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोलचा दर सर्वाधिक आहे. तर डिझेलचा दरही मुंबईत जास्त आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर ९०.७८ रुपये आणि डिझेल ८१.१० रुपये झाला आहे. कोलकत्ता राज्यात पेट्रोलचा दर ९०.९८ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८३.९८ रुपयावर पोहचले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल ९२.११ रुपये, डिझेल ८६.१० रुपये प्रति लीटर झाले आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये सतत घसरण होत राहिल्यास येणाऱ्या काही दिवसांमध्ये पेट्रोल-डिझेल प्रति लीटर २ रुपयांनी स्वस्त होऊ शकते. त्यामुळे खाद्य तेलाच्या किंमतींमध्येही घट होऊ शकते. कारण खाद्य तेलाच्या किंमती आणि पेट्रोल-डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतींवर ठरवले जातात. त्यामुळे सलग दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमधली घसरण दिलासाजनक आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरात प्रति लीटर २१.५८ रुपयांची वाढ झाली होती. तर डिझेलचे दर १९.१८ रुपये प्रति लीटरपर्यंत वाढले होते. यात राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्यात पेट्रोल डिझेलने १०० चा आकडा पार करुन रेकॉर्ड बनवला होता. परंतु आता काही राज्यांनी वॅट कम केल्याने पेट्रोल डिझेलचे दर कमी होत आहेत.