जिल्हा पोलीस अधीक्षक श्री वसंत परदेशी यांनी वाशीम जिल्हा पोलिस दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर नवीन संकल्पनेतून विविध कल्याणकारी विविध समाजोपयोगी कायदा व सुव्यवस्थेचे संबंधी संकल्पनांची अंमलबजावणी केली तसेच वेळोवेळी पोलीस ठाणे शाखांना भेट देऊन पोलिस स्टेशन येथे आवश्यक साधन सामुग्रीची विचारपूस करून त्यांची तातडीने पूर्तता करण्याकडे भर दिला जेणेकरून शासकीय कामे करताना पोलिस अधिकारी अंमलदार यांना अडचणी येणार नाहीत त्या अनुषंगाने बऱ्याच दिवसापासून पोलीस विभागाकरिता दिवसा व रात्री गस्ति करीता लागणाऱ्या मोटर सायकलची आवश्यकता असल्याचे निर्दशनास आले होती त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक साहेब वाशिम यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा नियोजन समिती वाशिम यांचे पत्र क्रमांक 251 2021 दिनांक 14 2 2019 एकूण एक कोटी 60 लाख रुपये जीप मोटरसायकल खरेदी करण्याकरिता मंजूर करण्यात आले
GEM पोर्टल द्वारे खरेदी करण्यात आलेल्या एकूण 30 बीट मार्शल बाईक माननीय पोलीस अधीक्षक वाशिम यांच्या आदेशाने आज दिनांक 8 मार्च 2019 रोजी महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आल्या वाशिम जिल्हा पोलीस दलाचे वाहनांच्या मध्ये नव्याने प्राप्त झालेल्या मोटरसायकल ह्या अतिशय वेगवान आहेत कसोटीवर असलेले पोलीस अमलदार हे वायरलेस द्वारे प्राप्त कॉल ला लवकरात लवकर प्रतिसाद देऊन गरजू महिला मुली अथवा ज्येष्ठ नागरिक किंवा इतर गरजू व्यक्ती पर्यंत त्वरित पोहोचून त्यांना तात्काळ मदत देण्यास उपयोगी होईल मोटरसायकलवर बसविण्यात आलेल्या जीपीएस द्वारे नमूद वाहन कोणत्या ठिकाणी आहे त्याचे लोकेशन तत्काळ संबंधित पोलीस स्टेशनला नियंत्रण कक्षास जीपीएस समजेल त्यादृष्टीने कोणते वाहन कोणत्या गरजेच्या ठिकाणी विनाविलंब पाठविणे शक्य आहे हे सोयीचे होईल माननीय पोलीस अधीक्षक श्री वसंत परदेशी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पाडण्यात आला तसेच जागतिक महिला दिनानिमित्त माननीय पोलीस अधीक्षक श्री वसंत परदेशी यांच्या हस्ते वाशिम पोलीस अधीक्षक कार्यालय येथील महिला अंमलदार यांना पुष्पगुच्छ देऊन जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यात आला सदर कार्यक्रमात माननीय पोलीस अधीक्षक श्री वसंत परदेशी यांचे मार्गदर्शनात माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार चव्हाण पोलीस उपाधीक्षक गृह श्री श्रीराम घुगे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा शिवाजी ठाकरे राखीव पोलीस निरीक्षक शिरसागर समस्त महिला वर्ग उपस्थित होते