जिल्ह्यात 1220 जण पॉझेटिव्ह ; 1112 कोरोनामुक्त तर जिल्ह्याबाहेरील एका मृत्युसह एकूण 37 मृत्यु yatmal covid-19 update - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, April 22, 2021

जिल्ह्यात 1220 जण पॉझेटिव्ह ; 1112 कोरोनामुक्त तर जिल्ह्याबाहेरील एका मृत्युसह एकूण 37 मृत्यु yatmal covid-19 update

( छायाचित्र संग्रहित )

जिल्ह्यात 1220 जण पॉझेटिव्ह ; 1112 कोरोनामुक्त त जिल्ह्याबाहेरील एका मृत्युसह एकूण 37 मृत्यु

यवतमाळ, दि. 22 : जिल्ह्यात गत 24 तासात 1220 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 1112 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 37 मृत्यु झाले. यातील 32 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर पाच मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले. तसेच एक मृत्यु जिल्ह्याबाहेरील आहे.
जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 6733 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1220 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5513 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5829 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 3027 तर गृह विलगीकरणात 2802 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 44456 झाली आहे. 24 तासात 1112 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 37599 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1028 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.06 असून मृत्युदर 2.31 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 68, 52, 81, 62 वर्षीय पुरुष आणि 70, 70, 72 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 66 वर्षीय पुरुष, कळंब येथील 50 वर्षीय पुरुष, कळंब तालुक्यातील 47 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, दिग्रस 28 वर्षीय महिला, एक वर्षाचा बालक, बाभुळगाव तालुक्यातील 34 वर्षीय पुरुष, घाटंजी येथील 51, 60 वर्षीय महिला, घाटंजी तालुक्यातील 40 वर्षीय महिला, राळेगाव येथील 50, 60 वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील 65, 65 वर्षीय महिला, वणी तालुक्यातील 53 वर्षीय महिला, आर्णि येथील 47 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 63 वर्षीय महिला, दारव्हा येथील 50 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, दारव्हा तालुक्यातील 60 वर्षीय महिला, पांढरकवडा येथील 65 वर्षीय महिला, उमरखेड येथील 75 वर्षीय पुरुष, पुसद येथील 81 वर्षीय पुरुष, भद्रावती येथील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 41 वर्षीय पुरुष, पुसद येथील 45 वर्षीय पुरुष आणि उमरखेड येथील 35, 52, 58 वर्षीय पुरुष आहे.
गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1220 जणांमध्ये 677 पुरुष आणि 543 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 273 पॉझेटिव्ह रुग्ण, उमरखेड 222, पांढरकवडा 155, वणी 126, मारेगाव 72, दारव्हा 66, पुसद 65, दिग्रस 59, नेर 41, घाटंजी 30, झरी 23, महागाव 21, आर्णि 21, बाभुळगाव 16, कळंब 15, राळेगाव 8 आणि इतर शहरातील 7 रुग्ण आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 368480 नमुने पाठविले असून यापैकी 364533 प्राप्त तर 3947 अप्राप्त आहेत. तसेच 320057 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 577 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 0 बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील चार डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 240 बेडपैकी 171 रुग्णांसाठी उपयोगात, 69 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 31 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2383 बेडपैकी 1648 उपयोगात, 736 शिल्लक आणि 23 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 789 बेडपैकी 594 उपयोगात तर 195 बेड शिल्लक आहेत.
अफवा पसरविणा-या मॅसेजवर विश्वास ठेवू नका : जिल्हाधिकारी यवतमाळ व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या नावाने फेक मॅसेज ग्रुपवर व्हायरल होत आहे. सदर मॅसेजचा जिल्हा प्रशासनाशी काहीही संबंध नाही. सदर मॅसेज पूर्णपणे चुकीचा व अफवा पसरविणारा असून अशा कोणत्याही सुचना जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्याकडून देण्यात आल्या नाही.
शासन आणि प्रशासनाच्या वतीने दिल्या जाणा-या मार्गदर्शक सुचना नागरिकांपर्यंत अधिकृतरित्या प्रसारमाध्यमांद्वारे पोहचविण्यात येतात, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
त्यामुळे फेक मॅसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा माहिती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Post Top Ad

-->