दिल्ली-गुजरातपेक्षाही अधिक कोरोनाबळी, नागपुरातील वाढत्या मृत्यूदराची 8 कारणं(Nagpur Corona) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, April 2, 2021

दिल्ली-गुजरातपेक्षाही अधिक कोरोनाबळी, नागपुरातील वाढत्या मृत्यूदराची 8 कारणं(Nagpur Corona)

                                                             (छायाचित्रे संग्रहित)

 नागपूर : नागपुरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचं तांडव सुरु आहे. दिल्ली आणि गुजरात राज्यात कोरोनामुळे जितके मृत्यू झाले नाहीत, तितके एकट्या नागपुरात होताना दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनासोबतच नागपूरकरांची चिंता वाढली आहे. नागपुरात मृत्यूदर इतका का वाढत आहे, याविषयी खास रिपोर्ट. राज्याची उपराजधानी नागपूर कोरोनाच्या विळख्यात आली आहे. सोबतच इथे मृत्यूची संख्या वाढत चालली आहे. दर दिवसाला 3 हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. मार्च महिन्याच्या 27 तारखेपासून मृत्यूचा आकडा 50 च्या वर पोहोचला आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्याच दिवशी 60 जणांचा मृत्यू झाला.

नागरिकांची हलगर्जी जीवावर

कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावरही सुरुवातीचे काही दिवस औषधोपचार करुन नागरिक घरीच राहत आहेत. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यावर सुरुवातीलाच डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि कोरोना चाचणी करुन घेणे आवश्यक आहे, परंतु नागरिक ते करत नसल्याचे चित्र नागपुरात बघायला मिळत आहे. हे सगळं चित्र नागपूरकरांची झोप उडवणारं आहे. सोबतच प्रशासनाच्या व्यवस्थेची पोलखोल सुद्धा करत आहे. आयएमएचे सचिव डॉ. राजेश सावरबांधे यांच्या माहितीनुसार नागपुरात वाढत्या मृत्यूसंख्येची कारणं पाहुयात

नागपूरमध्ये कोरोना मृत्यू दर वाढण्यामागील कारणं कोणती?

1. पहिली लाट कमी झाल्यानंतर नागरिकांमधील कोरोनाची भीती कमी झाली, त्यामुळे नागरिक नियम न पाळता बाहेर पडले
2. थोडा ताप किंवा खोकला वाटल्यास गोळ्या घेऊन घरीच राहणे
3. डॉक्टरांचा सल्ला न घेणे
4. कोरोना टेस्ट सांगून सुद्धा न करणे
5. लक्षण वाढल्यानंतर रुग्णालयात जाणे, तोपर्यंत केस डॉक्टरांच्या हाताबाहेर गेलेली असते
6. इतर आजार आणि कोरोना एकत्र आल्यामुळे मृत्यूची शक्यता जास्त
7. डॉक्टरकडे उशिरा पोहचणे, त्यातही ऑक्सिजन लागणारे रुग्ण जास्त असल्याने प्रक्रियेस उशीर होणे
8. बेडची संख्या कमी असल्याने मृत्यूचे प्रमाण वाढते

नागपुरात वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू

27 मार्च – 3688 रुग्ण , 54 मृत्यू
28 मार्च – 3970 रुग्ण , 58 मृत्यू
29 मार्च – 3177 रुग्ण , 55 मृत्यू
30 मार्च – 1156 रुग्ण , 54 मृत्यू
31 मार्च – 2885 रुग्ण , 58 मृत्यू
1 एप्रिल – 3639 रुग्ण , 60 मृत्यू

नागपुरात आता सरकारी आणि खाजगी रुग्णालयात किती बेड शिल्लक

ऑक्सिजन बेड – 246
आयसीयू बेड – 32
व्हेंटिलेटर बेड – 11

एवढेच बेड शिल्लक असून त्यातही काही बेड राखीव ठेवावे लागतात. त्यामुळे अनेक रुग्णांना बेडच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागपुरात कोरोनामुळे जाणाऱ्या बळींची संख्या वाढत आहे.


Post Top Ad

-->