आम्ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली; तुम्हीही लस घ्या, सुरक्षित व्हा !’• पत्रकार बांधवांचे नागरिकांना आवाहन - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, April 1, 2021

आम्ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली; तुम्हीही लस घ्या, सुरक्षित व्हा !’• पत्रकार बांधवांचे नागरिकांना आवाहन

 आम्ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली; तुम्हीही लस घ्या, सुरक्षित व्हा !• पत्रकार बांधवांचे नागरिकांना आवाहन


तुम्हीही लस घ्या, सुरक्षित व्हा !’
• पत्रकार बांधवांचे नागरिकांना आवाहन
• ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरणास प्रारंभ
• आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रातही मिळणार लस
वाशिम, दि. ०१ (जिमाका) : जिल्ह्यात ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना आज, १ एप्रिल पासून कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली. यानिमित्त जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या सूचनेनुसार वाशिम येथील ४५ वर्षांवरील पत्रकारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आज विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लस घेतलेल्या पत्रकारांनी ‘आम्ही लस घेतली, लस पूर्णतः सुरक्षित आहे, सर्व पात्र नागरिकांनी लस घेवून स्वतःला सुरक्षित करावे !’ असे आवाहन केले.
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश मडावी, डॉ. संदीप हेडाऊ, डॉ. लक्ष्मीकांत राठोड यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. राठोड म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित असून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी आपल्या नजीकच्या लसीकरण केंद्रात जावून ही लस घ्यावी. जिल्ह्यात ८८ लसीकरण केंद्र कार्यान्वित असून यामध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय यासह काही आरोग्य उपकेंद्रांचा व खाजगी लसीकरण केंद्रांचा समावेश आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी. पत्रकार बांधवांनी आज शिबिरामध्ये उपस्थित राहून स्वतः लस टोचून घेतली त्याबद्दल डॉ. राठोड यांनी त्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले.
पत्रकार नंदकिशोर नारे म्हणाले, कोरोना लस टोचून घेतल्यानंतर कोणताही त्रास जाणवला नाही. कोरोना प्रतिबंधक लस घेवून आपण स्वतःला सुरक्षित करणे आवश्यक आहे. त्यामुळे मी स्वतः आज लस घेतली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या दोन्ही कोरोना लसी पूर्णतः सुरक्षित असून जिल्ह्यातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार विश्वनाथ राऊत म्हणाले, जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असताना कोरोना लस घेवून स्वतःचा बचाव करणे आवश्यक आहे. मी स्वतः आज लस घेतली, मला कोणताही त्रास जाणवला नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लस घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार नंदकिशोर वैद्य म्हणाले, कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. ही लस घेतल्यामुळे कोणताही गंभीर दुष्परिणाम जाणवत नाही. त्यामुळे ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.

Post Top Ad

-->