"कोरोना की नही कहानी , हमारी बढती परेशानी" या विषयावर विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटन स्वास्थ्य समितीचे संयोजक डॉ. गोविंद झंवर व या वेबिनार चे सहसंयोजक डॉ. विजय चांडक द्वारा आयोजित या वेबिनार चा आयोजन
विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटन चे अध्यक्ष एडवोकेट रमेशचन्द्रजी चांडक तसेच सचिव डॉ. प्रो.रमनजी हेडा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पणे पार पडला आहे.
या वेबिनार चे प्रमुख उद्घाटक अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभा चे सभापती श्री श्यामजी सोनी व प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतवर्षीय माहेश्वरी सभेचे उपसभापती श्री त्रिभुवनदासजी काबरा उपस्थित होते.
विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटन चे निवर्तमान अध्यक्ष श्री मदनलालजी मालपाणी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमात नागपूर चे सुप्रसिद्ध हार्ट स्पेशलिस्ट डॉ. प्रमोदजी मुंदडा , नागपूर जिल्हा इंडियन मेडिकल असोसिएशन च्या अध्यक्षा डॉ. अर्चना जी कोठारी, डॉ. कमलजी भुतडा, डॉ. महेशजी सारडा , डॉ. शैलेंद्रजी मुंदडा, डॉ. स्वातीजी अट्टल व डॉ. राजेशजी अट्टल यांनी या वेबिनार मध्ये सहभागी झालेल्या सर्व समाज बांधवांना कोरोनाच्या बचावासाठी योग्य माहिती देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले व जागृत राहायला सांगितले.
डॉ. प्रमोद मूंदड़ा :
कोरोना ची दूसरी लहर ही पहिल्या लहर पेक्षा जास्त संक्रमणक आहे व एकाच कुटुंबातील जवळ जवळ सगळे सदस्य या रोगामुळे आजारी होत आहे. अशावेळी आपण सगळ्यांनी सावधानी बाळगून कोरोना च्या वाढत्या संक्रमणाला थांबवणे गरजेचे आहे.
डॉ. अर्चना कोठारी
कोरोना संक्रमणानंतर बरेच रुग्ण बरे होत आहेत परंतु काही रुग्ण ज्यांना ब्लड प्रेशर, डायबिटीस , हार्ट अटॅक, कॅन्सर असे आजार आहेत ते रुग्ण कोरोना च्या संपर्कात आल्यावर मृत्यूमुखी पडत आहेत. अशा सर्व रुग्णांनी सावधानी बाळगणे अत्यावश्यक आहे.
डॉ. विजय चांडक
घरातून बाहेर पडताना मास्कचा वापर करणे, वारंवार हात धुणे , तसेच एकमेकांपासून किमान सहा फूट अंतर ठेवणे गरजेचे आहे.
डॉ. राजेश अट्टल
आज जवळजवळ सगळीकडे कोरोना लस उपलब्ध आहे तरी सगळ्यांनी ती लस घेणे आवश्यक आहे. यामुळे येत्या काळात कोरोना होण्याची शक्यता कमी राहील व कदाचित कोरोना झाला तर त्याची तीव्रता कमी राहील.
डॉ. महेश सारडा
कोणाच्या निदानासाठी RTPCR चाचणी ही एंटीजेन चाचणी पेक्षा अधिक योग्य आहे. जर आपण आजारी आहात तर आपण डॉक्टरचा योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे.
डॉ. शैलेंद्र मुंदडा
RTPCR चाचणीत जर सिटी वोल्युम कमी असेल तर त्या रुग्णाच्या शरीरात कोरोना चे जंतू अधिक प्रमाणात आहेत व अशा रुग्णांन पासून कोरोना चा अधिक प्रसार होण्याची संभावना आहे.
डॉ. स्वाती अट्टल
व्यावसायिक कामांसाठी आपल्याला घराबाहेर पडणे जरुरी असते परंतु आपण बाहेर जाताना एकमेकांपासून सहा फूट अंतर ठेवले पाहिजे , मास्कचा वापर केला पाहिजे व वारंवार हात धुतले पाहिजे. कोरोना च्या बचावासाठी हे करणे अत्यंत गरजेचे आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ गोविंद झंवर यांनी केले .उद्बोधन अध्यक्ष ॲड रमेशचंद्र चांडक यांनी केले. तर मुख्य संचालन विदर्भ प्रादेशिक संगठन चे सचिव प्रा डॉ रमण हेडा तसेच डॉ प्रमोद मुंदडा डॉ चांडक यांनी केले