ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी CHANDRAPUR - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, April 19, 2021

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी CHANDRAPUR

 

( छायाचित्र संग्रहित )
ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी -जिल्हाधिकारी

Ø नागरिकांनी लक्षणे आढळल्यास चाचणी करण्याचे आवाहन
चंद्रपूर दि.17 एप्रिल:- गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच ऑक्सिजनच्या मागणीत देखील मोठी वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. कोविड रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी दोन वितरक नेमण्यात आलेले आहेत. या वितरकाकडून ऑक्सिजन पुरवठा पूर्ण क्षमतेने उपलब्ध करण्याबरोबरच इतर ठिकाणाहून सुद्धा ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चाललेला आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, आई.सी.यु आणि व्हेंटिलेटर बेडची अधिक गरज असते. रुग्णांना योग्य त्या आरोग्य सुविधा आणि सेवा मिळाव्यात यासाठी प्रशासनामार्फत जिल्ह्यात पाच शासकीय तर उर्वरित खाजगी रुग्णालये असे एकूण 29 ऑक्सिजन सुविधा युक्त रुग्णालये रुग्णांच्या सेवेसाठी कार्यान्वित करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यात डेडिकेटेड कोविड रुग्णालय व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर यात 93 आयसीयु व्हेंटिलेटर बेड, 224 आयसीयु ऑक्सिजन बेड, तर 750 ऑक्सिजन बेड असे एकूण 1 हजार 67 बेड उपलब्ध आहेत.
नागरिकांनी घाबरून न जाता कोणतीही लक्षणे आढळल्यास तात्काळ चाचणी करून घ्यावी. तसेच लवकर उपचार घ्यावेत. नागरिकांनी घराबाहेर न पडता घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Post Top Ad

-->