रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना गोंदियात अटक (two arrested in black market of remdesivir in gondia) - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, May 7, 2021

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना गोंदियात अटक (two arrested in black market of remdesivir in gondia)


 ( छायाचित्र संग्रहित )

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना गोंदियात अटक

३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

गोंदिया शहर पोलिसांची कामगिरी 

गोंदिया-: रेमडेसिव्हिर इंजेक्‍शनचा काळाबाजार (black market of remdesivir injection) करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (gondia crime branch) पथकाने अटक केली. ही कारवाई बुधवारी (ता.५) येथे करण्यात आली. सागर पटले (वय २०, रा. मोठा रजेगाव, जि. बालाघाट) आणि अशोक चव्हाण (रा. शास्त्री वॉर्ड, गोंदिया) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सागर पटले हा येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात (kts district hospital gondia) सफाई कामगार, तर अशोक चव्हाण हा अधिपरिचारक आहे. (two arrested in black market of remdesivir in gondia)


गोंदिया शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. यावेळी त्यांना केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील सफाई कामगार सागर पटले हा विनापरवाना रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन वाजवीपेक्षा अधिक दरात म्हणजे प्रत्येकी १८ हजार रुपयांनी विकत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खात्री झाल्यानंतर सापळा रचला व सागर पटले याला येथील इंदिरा गांधी स्टेडियमजवळून ताब्यात घेतले. त्याच्याकडून दोन रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन जप्त केले आहेत.


दरम्यान, त्याला इंजेक्‍शन कुठून आणले, याबाबत विचारले असता सदर इंजेक्‍शन केटीएस रुग्णालयातील अधिपरिचारक अशोक चव्हाण याच्याकडून आणल्याचे सांगितले. यावरून अशोक चव्हाणलाही ताब्यात घेतले. त्याला इंजेक्‍शनबाबत विचारपूस केली असता त्याने सदर इंजेक्‍शन केटीएस रुग्णालयातील औषध भांडारातून उपलब्ध झालेल्या इंजेक्‍शनमधून काही इंजेक्‍शन स्वतःजवळ ठेवल्याचे सांगितले. तसेच ते इंजेक्‍शन विक्री करीत असल्याचेही सांगितले. यावेळी त्याच्या ताब्यातून दोन रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन व दोन मोबाईल हॅण्डसेट्‌स असा एकूण ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गोंदिया शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

Post Top Ad

-->