टिव्ही जर्नालिस्ट संघटनेची मागणी जिल्हाप्रशासनाने केली पुर्ण - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, May 10, 2021

टिव्ही जर्नालिस्ट संघटनेची मागणी जिल्हाप्रशासनाने केली पुर्ण


प्रसारमाध्यम व पत्रकारांना पेट्रोल-डिझेल देण्याच्या  मागणीसाठी टीव्ही जर्नालिस्ट   संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते. संघटनेच्या मागणीची दखल घेत काल निघालेल्या लॉकडाऊनच्या आदेशात पत्रकारांना पेट्रोल डिझेल मिळणार असल्याचे नमूद केले आहे केल्या दिड वर्षापासून कोरोना काळामध्ये पत्रकार आपल्या जीवाची पर्वा न करता वार्तांकन करत आहेत कोरोना संदर्भात घेतली जाणारी काळजी व शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना संदर्भात आपल्या वार्तांकनातून जनजागृती करत आहेत वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारांना वेळोवेळी बाहेर फिरावे लागत असल्याने आपल्याकडून कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या आदेशामध्ये पत्रकारांचा नामोल्लेख नसल्याकारणाने फ्रन्टलाइन वर्करला  देण्यात येणाऱ्या सुविधा पत्रकारांना मिळत नाही असे आदेश आपल्याकडून काढण्यात आले आहेत त्या काढलेल्या आदेशामध्ये सकाळी ते 7 ते 11 पर्यंत पेट्रोल पंप सूरु राहतील व 11 वाजे नंतर केवळ फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना पेट्रोल व अन्य सुविधा देण्यात येत मात्र या काळात पत्रकारांना फ्रन्टलाइन वर्कर सारख्या सुविधा देण्याकरीता पत्रकारांना आवर्जून करावे अशी विनंती बुलडाणा टिव्ही जर्नालिस्ट संघटना यांच्या वतिने करण्यात आली होती याचं मागणीचा दखल घेत जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांनी आज पासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊन संदर्भाच्या नियमावलीत फ्रन्टलाइन वर्कर म्हणून पत्रकारांना सुध्दा पेट्रोल पंपावर पेट्रोल व‌ डिझेल सुविधा देण्यात यावी असे नमूद केले आहे त्यामुळे पुन्हा एकदा बुलडाणा जिल्हा टिव्ही जर्नालिस्ट संघटनेच्या मागणीला यश मिळाले आहे

Post Top Ad

-->