आयसीआयसीआय फाउंडेशन व आयसीआयसीआय बँकेकडून जिल्हा सामान्य रुग्णालयाला 1 अद्ययावत रुग्णवाहिका
आयसीआयसीआय फाउंडेशन व आयसीआयसीआय बँकेकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयाला ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ प्रकारातील एक अद्ययावत रुग्णवाहिका २७ जुलै रोजी सुपूर्द करण्यात आली.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या उपस्थितीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी आयसीआयसीआय बँकेचे प्रादेशिक अधिकारी गोपाल उन्हाळे व वाशिमचे शाखा व्यवस्थापक हेमंत बनकर यांच्याकडून रुग्णवाहिकेची चावी स्वीकारली.