परसबागेतील भाजीपाला उत्तम आरोग्यदायक आहार- सौरभ कटीयार
अकोला, दि.१३(जिमाका)- ‘उमेद’ अभियानअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागात परसबाग लावण्यासाठी प्रयत्न होत आहेत. या परसबागेत पिकवलेला सेंद्रीय व आहारमूल्य असलेला भाजीपाला हा संपुर्ण कुटूंबासाठी उत्तम आरोग्यदायक आहार असून परसबाग तयार करण्याच्या उपक्रमाला अधिकाधिक चालना दिली जावी,असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी व्यक्त केले.
‘उमेद’ अभियान अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे निर्मित जिल्हास्तरीय पोषण परसबागेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अती. मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष पवार, जिल्हा अभियान व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अकोला गजानन महल्ले, उमेद अभियानाचे सर्व जिल्हा व्यवस्थापक व तालुका अभियान व्यवस्थापक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक सुरज गोहाड, कृषी विज्ञान केंद्राच्या शास्स्त्रज्ञ श्रीमती कीर्ती देशमुख उपस्थित होते.