(Apala Vidarbha news network देवानंद सानप लोणार)
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याला गेल्या पंधरा दिवसांपासून मुसळधार पावसानं झोडपून काढले असून अनेक गावांत नदी, नाले, ओसंडून वाहू लागले आहेत नदी काठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्याच्या घटना अनेक गावांत घडल्या आहेत.
लोणार तालुक्यात भुमराळा, वझर आघाव, सावरगाव तेली, किनगाव जटटू,चिखला,पिंपरी खंदारे, बिबी,मांडवा,चोरपांगरा,सहीत अनेक गावांत सततच्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन,कपाशी मुंग,उडीद,सह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेताला तलावाचे स्वरुप आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पिक नजरेसमोर सुकून गेले आहेत अती पावसामुळे सोयाबीन, कपाशी, मुंग, उडीद,सह अनेक पिके सडून चालली आहे त्यामुळे हवे तसे उत्पन्न होणार नसल्याचे शेतकरी बोलत आहे पाउस जर थांबला नाही तर लावलेला खर्च ही निघने कठीण होऊन बसले आहेत्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे त्यामुळे अती पावसामुळे नुकसान झालेल्या गावात ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा अशी मागणी सर्वच शेतकरी करत आहेत.