नागपूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर डोणगाव महामार्गावर डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील नागापूर जवळ असलेल्या ट्रकला दुचाकीची धडक होऊन डोणगाव येथील दुचाकी चालक गणेश गजानन विढोळे हा युवक ठार झाल्याची घटना दि.17/09/2021 च्या रात्री घडल्याची बोलल्या जात आहे
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नागापूर जवळ असलेल्या ट्रकला.मेहकर वरुन डोणगाव कडे येणाऱ्या दुचाकी चालक गणेश गजानन विढोळे वय वर्षे 22 यांची ट्रकला धडक झाल्याने या धडकेत गणेश विढोळे या युवक ठार झाल्याची घटना घडली आहे सदर युवक हा अतिशय मनमिळावू प्रेमळ स्वभावाचा असल्यामुळे आज डोणगाव येथे सर्वच गावांवर शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. सदर मिळालेली माहिती ही प्राथमिक आहे वृत्त लिहीपर्यंत डोणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला नव्हता.