Bhandaraआदिशक्ती शितला माता In the temple मंदिरात १ हजार ३२१ घटाची स्थापना - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, October 13, 2021

Bhandaraआदिशक्ती शितला माता In the temple मंदिरात १ हजार ३२१ घटाची स्थापना

 


आदिशक्ती शितला माता In the temple मंदिरात १ हजार ३२१ घटाची स्थापनाशितला

 माता ही नवसाला पावणारी.दहा वर्षापासुन मातेकरिता शिर्डी वरून येते गुलाब हार हिंदु- मुस्लिम बांधवांचा जातीय सलोखा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व शासकीय दिशा निर्देशाचे पालन

आदिशक्ती शितला माता मंदिरात नवरात्रोत्सव दरम्यान दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू आहे. कमेटीचे अध्यक्ष ईश्वरदास काबरा, उपाध्यक्ष शरद नखाते, सचिव सत्यनारायण व्यास, कोषाध्यक्ष धनराज धुर्वे व सदस्य गण यांच्या देखरेखे खाली मंदिराचा कायापालट होत आहे. 

देवीची मूर्ती पूर्वी उघड्यावर एका ओट्यावर स्थापन केली होती. आदिशक्ती शितला माता ही नवसाला पावणारी असल्याने मंदिराच्या परिसरातील हिंदु- मुस्लिम बांधवांनी एकञ येऊन स्वच्छता केली होती. त्यातुनच  अतिप्राचीन मंदिराचा जिर्णोद्धार झाला आहे. नवनिर्मित मंदिरात मातेची मूर्ती अधिक आकर्षक व प्रासादिक भासते. तसेच रात्री रोषणाईने मंदिराचे सौंदर्य खुलून दिसते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम व शासकीय दिशानिर्देशाचे पालन मंदिर व्यवस्थापन समितीकडून केले जात आहे. मंदिराचे आकर्षक व मनोवेधक रूप भाविकांना भुरळ घालत आहे.आदिशक्ती

शितला माताचे पुरातन मंदिर जिल्हावासींचे आराध्य दैवत व श्रद्धास्थान आहे.

नवरात्र महोत्सवात भंडारा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. तसेच  यावर्षी १ हजार ३२१ घटाची स्थापना करण्यात आली आहे. दहा वर्षापासुन मातेकरिता शिर्डी येथुन गुलाब हार येत आहे. मंदिरात दररोज सकाळी व सायंकाळी ७ वाजता आरती होत असते. 
 जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत जाधव व भंडारा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पुल्लकवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी वाहतुकीवर नियंञण ठेऊन पार्किंग व्यवस्था करत आहेत. अष्टमीपुजा व हवन बुधवार दि. १३ ऑक्टोंबर ला दुपारी ४ वाजता केली जाणार आहे. तसेच घट विसर्जन दि. १४ ऑक्टोंबर ला सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत करण्यात येणार असल्याची माहीती आदिशक्ती शितला माता मंदिराचे कोषाध्यक्ष धनराज धुर्वे  यांनी सांगितले.

Post Top Ad

-->