(आपला विदर्भ लाईव्ह प्रतिनिधी अंकुश ठोकळ कनका)
कनका : मेहकर तालुक्यातील कनका येथील शेतकऱ्यांच्या दोन एकरांतील सोयाबीनच्या सुडी अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
येथील शेतकरी महीला गीताबाई श्रीकांत अजगर ह्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांती त्यांच्या पतीच्या भावाला सुधाकर अजगर यांना ठोक्याने दिलेल्या शेतातील कनका र्खु शिवारातील दोन एकरा मधील सोयाबीन सोंगून गंजी लावून ठेवली होती. या घटनेची डोणगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली असुन. डोणगाव पोलिस तपास करीत आहेत. अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तर कसेबसे आलेले सोयाबीन तेही अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी पि. एस. राठोड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व पंचनामा करून वरीष्ठाकंडे पाठविला आहे. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष राजेभाऊ ठोकळ, अनिल ठोकळ, कोतवाल संजय खिल्लारे, पुंडलिक अजगर, पंडीत ठोकळ, भास्कर अजगर, सुधाकर अजगर, गजानन इंगळे, गजानन अजगर, सुनील अजगर सह शेतकरी उपस्थित होते..