अल्पसंख्याक उमेदवारांची पोलीस शिपाई भरती पूर्वपरीक्षा प्रशिक्षण निवड प्रक्रिया स्थगित
बुलडाणा, (जिमाका) दि. 11 – सन 2021-22 मध्ये अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांकरीता पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमातंर्गत पोलीस कवायत मैदान, बुलडाणा येथे गुरूवार, 21 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून प्रशिक्षणासाठी अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांची निवड करण्यात येणार होती. याबाबत प्रसिद्धीही देण्यात आली होती. मात्र प्रशासकीय कारणास्तव 21 ऑक्टोंबर रोजी नियोजित असलेली निवड प्रक्रिया तुर्त स्थगित करण्यात येत आहे. त्यानुसार अल्पसंख्याक समाजातील तरूणांकरीता पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत होणारी निवड प्रक्रिया पुढील नियोजित दिनांकापर्यंत स्थगित ठेवण्यात आली आहे. याबाबत पुढील नियोजित दिनांक व वेळ प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात येणार आहे. तरी यासंदर्भात अल्पसंख्याक समाजातील तरूणांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले आहे.