स्व रमेशकाका सावजी प्रथम पुण्यस्मरण निमित्त गुणवंताचा सत्कार
संजीवनी सेवाभावी परिवार डोणगांव च्या वतिने आयोजीत शिक्षणप्रेमी ,शेतिनिष्ठ शेतकरी, दानशुर स्व रमेशकाका सावजी यांच्या पुण्यतिथी निमित्त गुणवंताच्या सत्कार कार्यक्रमात आदर्श व्यक्तीमत्वाच्या पुण्यस्मरण व जयंती कार्यक्रमातुन आजज्या युवकांना प्रेरणा मिळतेअसे प्रतिपादन खा प्रतापराव जाधव यांनी केले
दि ७ आँक्टोबर रोजी विष्णु बाळकृष्ण सावजी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परम पुजनिय विश्वास महाराज (जालना) तर प्रमुख अतिथी म्हणून खा प्रतापराव जाधव,माजी मंत्री सुबोध सावजी, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटीचे सरचिटणीस मा शाम उमाळकर,जि प सभापती राजेन्द्र पळसकर, शेतकरी संघटनेचे नेते डॉ अशोक पातुरकर, प्रगतशिल शेतकरी शाम गट्टाणी, अशोकराव थोरहोते ,संपतराव देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते, स्व रमेशकाका सावजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, प्रास्ताविक मनोगतातुन डाँ गजानन उल्हामाले यांनी स्व रमेशकाका सावजी यांच्या जीवनकार्यवर प्रकाश टाकला,
यावेळी जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या चि अर्णव साबळे, मंगेश शिंदे, समर्थ पळसकर, आदर्श वावखेडे, अनुराग डोंगरदिवे, कु अनूष्का जाधव, कु श्रध्दा देवकर या गुणवंताचा स्मृति चिन्ह व स्कुल बँग देवुन मान्य़वंराच्या हस्ते सत्कार करण्यात आला, या प्रसंगी डाँ मयुरा कथणे(नागपुर),प्रा निकस सर, स्वरूची मंदार सावजी (अकोला) सह सर्व मान्यवंरानी आंदरजली पर मनोगत व्यक्त करून गुणवंताचा गुणगौरव केला,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हमीद मुल्लाजी, प्रा गजानन सातपुते तर आभार प्रा सुरेन्दसिंह चव्हाण यांनी मानले,यशस्वीते साठी दिपक आखाडे, अभिजीत सावजी, हितेश सदावर्ते, सुरेशआप्पा फिसके ,गणेश वाघमारे, संदिप राठोड सह युवा सदस्यांनी अथक परिश्रम घेतले