,Buldana,Injured monkey released into the air since day 3 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने जखमी माकडालावर उपचार - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, October 16, 2021

,Buldana,Injured monkey released into the air since day 3 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने जखमी माकडालावर उपचार

 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने जखमी माकडालावर उपचार 

बुलडाणा जिल्ह्यातल्या शेवटच्या टोकावर असलेले डोणगाव येथे मागील तीन दिवसा आधी शेतात एका माकडाला श्लोक लागल्याची घटना घडली होती या माकडाला संबंधित शेतकऱ्यांनी उपचार केला होता. मात्र संबंधित वन विभागाने कोणतीच दक्षता न बाळगणारे जखमी अवस्थेत असलेले माकड हे वाऱ्यावर सोडून दिले व ते माकड जखमी  अवस्थेत एका ठिकाणी आढळले.


ही बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  कार्यकर्ते देवेंद्र आखाडे यांच्या लक्षात आली आणि त्यांनी संबंधित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांना कळवली असता तात्काळ जिल्हाध्यक्ष हे वनउपज तपासणी नाका डोणगाव येथे दाखल झाले व सोबतच  संघटनेचे  कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने वन उपच तपासणी नाका येथे दाखल झालेअसता वन विभागात तारांबळ उडाली, 

आणि मग चालू झाला जखमी अवस्थेत असलेल्या माकडाचा शोध अखेर जखमी अवस्थेत असले माकड एका ठिकाणी मिळून आले आणि  त्यावर उपचार करून  मागडाला संबंधित वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी  रेंज ऑफिस घाटबोरी येथे रवाना करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटने च्या पुढाकाराने जखमी अवस्थेत असलेल्या  माकडाला एक नवे जीवनदानच मिळाले असं म्हणता येईल,याप्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले, देवेंद्र आखाडे गणेश जुनघरे. अमोल धोटे सह  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 स्वाभिमानी शेतकरी संघटने च्या पुढाकाराने जखमी अवस्थेत असलेल्या  माकडाला एक नवे जीवनदानच

Post Top Ad

-->