उद्या ला दसरा असल्याने झेंडू च्या फुलांना मोठी मागणी असते
(आपला विदर्भ LIVE देवानंद सानप लोणार)
आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास
लोणार कडून देऊळगाव राजा कडे जाणाऱ्यां महिंद्रा पिकप MH 28 AB 5565 गाडी किनगाव जटटू बस स्टँड वर पलटली पलटी झाल्याबरोबर किनगाव जट्टू येथील शेख तोफिक यांनी तात्काळ मालवाहू गाडीच्या ड्रायव्हरला गेट मधून बाहेर काढले सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही
गाडी पलटी झाल्याने गाडीतील झेंडूचे फुले रस्त्यावर पडली असता गावकऱ्यांनी सर्व फुलें जमा करून गाडीमध्ये साठवली
किनगाव जट्टू येथील नागरिकांनी जेसीबीच्या साह्याने झेंडूच्या फुलाचे पिकप सरळ करून रस्त्याच्या कडेला उभे करून वाहतूक सुरळीत केली