गुणवंताचा गुणगौरव करून महात्मा फुले स्मृति दिन साजरा
अपयश पचवून यशप्राप्ती साठी गरुडझेप घ्या,ठाणेदार अपसुंदे
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मेहकर तालूका यांच्या वतिने महात्मा फुले यांच्या स्मृति दिना निमित्त आयोजीत गुणवंताचा गुणगौरव कार्यक्रम मध्ये ठाणेदार अपसुंदे यांनी अपयश पचवून यशप्राप्ती साठी गरुडझेप घ्या असे प्रतिपादन केले,
दि 28 जाने म फुले यांच्या स्मृति दिना निमित्त हाँटेल अे के वर गुणवंताचा गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रविन्द्र आखाडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ठाणेदार निलेश अपसुंदे, प्राचार्य सोहेल शेख, मुरलीधर लांभाडे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष संदिप पांडव, स्वाभिमानी चे अमोल धोटे आदि मान्यवर उपस्थित होते,सर्व प्रथम दिप प्रज्वलन करुन महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवंराचा शाल, श्रिफळ व पुष्पहाराने स्वागत करण्यात आले ,प्रास्ताविक मनोगतातुन डाँ नकुल फुले यांनी या कार्यक्रम आयोजन संदर्भात माहिती दिली,
यावेळी पुरस्कार प्राप्त जेष्ट पत्रकार अशोकराव वानखेडे ,विदर्भ चिफ ब्यूरो पदि निवड झालेले पत्रकार देविदास खनपटे, निटच्या परिक्षेत नेत्रदीपक सुयश प्राप्त करणार्या राहुल भा बाजड, अभिषेक ज्ञानेश्वर तायडे, कु शामल दिलीप अढाव, विरेंद्र संजय अजगर, कृष्णा संजय पवार या गुणवंताचा स्मृतिचिन्ह, मानपत्र, व शाल श्रिफळ देवुन सत्कार करण्यात आला, उपस्थित मान्यवंरासह गुणवंतानी आपल्या सत्काराला उत्तर दिली, ध्येय उंच ठेवून शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या जोरोवर आपल्या आईवडीला सह गांवाचे नांव उज्वल करा असे भावपूर्ण मनोगत ठाणेदार निलेश अपसुंदे यांनी व्यक्त केले,
सुत्रसंचालन हमीद मुल्लाजी तर आभार अक्षय फुले यांनी मानले, यशस्वितेसाठी समता परिषदेचे मंगेश भालेराव, प्रा इलियास बागवान, प्रा सरवर खान, विलास बाजड, कार्तिक पळसकर आदिनी अथक परिश्रम घेतले, राष्टगिताने कार्यक्रमाची सांगता झाली