Buldana,Ravikant Tupkar's घराभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, November 19, 2021

Buldana,Ravikant Tupkar's घराभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त


     येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची होतेय चौकशी

आंदोलन स्थळी तणावपूर्ण शांतता

पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरीही गाठतायेत तुपकरांचे घर

17 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला आज संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्यागाला आज तिसरा दिवस असून  ठिकठिकाणी  मोठ्या प्रमाणात रास्तारोको करण्यात आला...दरम्यान प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नसल्याने कार्यकर्ते व शेतकरी आक्रमक झाले आंदोलनस्थळी तुपकरांच्या निवासस्थानाबाहेर एका संतप्त कार्यकर्त्याने आपल्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि एकच गदारोळ उडाला...पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली 


आणि मलकापूर औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्तारोको करत जोरदार घोषणाबाजी झाली दरम्यान पोलिसांच्या गाडीच्या काचा देखील फोडण्यात आल्या ...तारांबळ उडालेल्या प्रशासनाने सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले शेवटी काही कालावधीनंतर प्रकरण निवळले परंतु सद्यस्थितीत तुपकरांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. शेतकरी पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने तुपकरांच्या घरासमोर जमत आहे. सध्या तुपकरांच्या घरासमोर तणावपूर्ण शांतता आहे 

Post Top Ad

-->