(छाया चित्र संग्रहित)
दुचाकी सह 48 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त
बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध गुटखा विक्रीला नेत असताना पोलिसांनी सापळा रचून गुटख्यासह मुद्देमाला व आरोपीला घेतले ताब्यात.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्राम शेलगाव देशमुख रोडवर डोणगाव शिवरात एक मोटरसायकलस्वार अवैधरीत्या शासनाने प्रतिबंधक केलेल्या सुगंधी गुटखा व तंबाखू जवळ बाळगून अवैध रित्या विक्रीसाठी नेत असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास सापळा रचून ताब्यात घेतले असता त्यांच्या जवळ नजर विमल विमल पान मसाला झेड विमल तंबाखू असे सुगंधी गुटखा व तंबाखू असा एकूण 32 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल व एक मोटर सायकल किंमत 1600 हजार रुपये असा एकूण 48 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल आरोपी मल्लीकाअर्जून सुधाकर अप्पा साखळकर वय वर्षे 38 यांच्या कडे मिळुन आला. मल्लीकाअर्जून अप्पा साखळकर याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यावर कलम 328/188/272/273 सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाई ठाणेदार निलेश अपसुंदे यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली पोउपनि राठोड, पोलीस पवण गाभणे पोलीस विकास राऊत यांनी केली आहे