बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई
पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन इसमांना घेतले ताब्यात
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर परिसरात Illegal weapons विक्रीसाठी येत असल्याची माहिती बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यप्रदेशातील पाचोरी या गावातून आलेल्या दोन आरोपींना तीन गावठी पिस्तूल व सहा जिवंत काडतुसांसह संग्रामपूर परिसरातून ताब्यात घेतले.
सिताराम मोतीराम भिलाले व हिरचंद भूवानसिंग भिलाले अशी आरोपींची नावे असून दोघेही मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर तालुक्यातील रहिवासी आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 76 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुलडाणा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बळीराम गीते व सहकाऱ्यांनी पार पाडली.