माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठा,ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे काम पूर्ण
ओमीक्रोनला,रोखण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सज्ज.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत व ओमायक्रॉनच्या काळात रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्लांट उभारण्यात आला आहे. या प्लांटमुळे वेळ पडल्यास एकाचवेळी एक हजार रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करता येणार आहे.
एक महिन्यापूर्वी या प्लांटचे काम पूर्ण झाले असून आता केवळ कनेक्शन देणे बाकी आहे लवकरचं हा प्लांट सुरू करण्यात येत असल्याने माजलगाव करानी समाधान व्यक्त करीत आहेत
जास्त रुग्णांना दररोज ऑक्सिजनचा कोरोनाची कितीही मोठी लाट आली तरी ऑक्सिजन पुरवठा केला जाऊ शकतो एवढी क्षमता या plant मध्ये असल्याने माजलगाव करानी आरोग्य प्रशासन वर समाधान व्यक्त केले आहे तसेच या प्लांट मधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजन हे १३ मेट्रिक टन एवढी निर्माण होणार आहे,तसेच ऑक्सिजन जनरेट प्लांटची क्षमता १.७५ मेट्रिक टन इतकी आहे. लिक्विड मेडिकल ऑक्सिजनमध्ये लिक्विड भरल्यानंतर ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते, तर ऑक्सिजन जनरेट प्लांटमध्ये ऑटोमॅटिक ऑक्सिजन तयार होऊ शकतो.यामुळे ग्रामीण रुग्णालय ओमीक्रोन रोखण्यासाठी सज्ज असल्याचे सांगण्यात आले