पिक विमा तालुका तक्रार निवारण समितीची सभा संपन्न.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दि.१५डिंसेबर व २७डिंसेबर,तसेच ४ जानेवारी रोजीच्या रविकांतजी तुपकर साहेब यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून व पाठपुराव्यामुळे र पिक विम्याच्या प्रश्नांवर आज मुद्दे निहाय चर्चा करून शेतकऱ्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने पिक विमा तालुका तक्रार निवारण समितीच्या उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात बैठक पार पडली,या बैठकीमध्ये तालुक्यातील सर्वच गावातील शेतकऱ्यांचे सविस्तरपणे मुद्दे घेण्यात आले. पिक विमा न मिळणे,कमि मिळणे,तक्रार करुन पिक विमा न मिळणे,असे सर्वच प्रश्नावर बैठक संपन्न
यावेळी नायब तहसीलदार पिंपरकर,उपविभागीय कृषि अधिकारी,ए.के.मिसाळ,तालुका कृषि अधिकारी किशोर काळे,सह कृषि सहाय्यक,स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले,तालुका अध्यक्ष प्रफुल्ल देशमुख,युवानेते देवेंद्र आखाडे,अरविंद दांदडे,सह सावञा,आरेगांव,अंञी देशमुख,सोनार गव्हान,वरुड,शेंदला, कनका बु.,डोणगांव,गोहोगांव दांदडे,जानेफळ सह परीसरातील शेतकरी उपस्थित होते