BULDANA प्रेरणा घेऊन परतत असताना हर्ष झालेल्या आंबेवाडी येथील तरुणाचा मृत्यू - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, January 6, 2022

BULDANA प्रेरणा घेऊन परतत असताना हर्ष झालेल्या आंबेवाडी येथील तरुणाचा मृत्यू


प्रेरणा घेऊन परतत असताना  हर्ष झालेल्या आंबेवाडी येथील तरुणाचा मृत्यू 


बुलडाणा -: गोपीनाथजी मुंडे यांचा जन्मदिवस12 डिसेंबर ,  रोजी   संघर्ष ज्योत विचार मंच समिती अध्यक्ष डॉ सुनील तोताराम कायंदे सह मित्रमंडळ राष्ट्रमाता मॉं जिजाऊ जन्मस्थळ सिंदखेडराजा राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यापासून  गोपीनाथ गडापर्यंत सहर्ष ज्योत ,विचारज्योत पेटती मशाल घेऊन लोकनेत्याचे दर्शन  आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन  अतिउत्साही आंबेवाडी तालुका सिंदखेडराजा येथील सोळा ते सतरा वर्ष वय असलेल्या विशाल रामसाद सानप  ह्याने स्व .गोपिनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्या सोबत सेल्फी काढली .परंतु  या सेल्फीचा घरा पर्यंत आनंद विशाल यास आणता आला नाही  आणि परळी पासून जेमतेम 20 कीलो मीटर अंतरावर मी जवळुन सेल्फी काढली , म्हणून सवंगडी यांना सांगतांना विशाल याला हार्दयविकाराचा  झटका आला अन त्यात त्याने जीव गमावला घरची परिस्थिती बिकट ,घर चौफेर चांदण्याटिन पत्राचे  वडीलास एकटा ,एक कुमारी बहीण  असा प्रपंच असतांना डॉ सुनील कायंदे मित्रमंडळ समोर आले अन रोख एक लाख रुपये अन त्या मुलीच्या नावाचे एफ डी एक लाखाचे असे त्या सानप दांपत्यास देउन अजूनही काही मदत लागल्यास करू असे कायंदे यांनी सांगितले 

तर सानप यांनी गोपीनाथ मुंडे यांचे दर्शन घेऊन मृत्यू आला  याचा अभिमान असून समाजा पुढे आदर्श निर्माण केला याचा मला सार्थ अभिमान आहे असे साधना न्यूज शी बोलतांना विशाल चे वडील रामप्रसाद सानप यांनी सांगितले

Post Top Ad

-->