पंप हाऊस मधील साहित्याची चोरी प्रकरणातील ५ आरोपींना भंडारा पोलिसांनी केली अटक
५ लाख ३१ हजाराचा मुददेमाल जप्त
भंडारा जिल्ह्याची जिवनवाहीनी, शहराजवळील असलेल्या वैनगंगा नदीच्या किणाऱ्यावरील स्मशानभुमीकडे जाणाऱ्या मार्गावरिल, विसावा स्थळ परिसर, कंपनी प्रोटेक्शन वॉलच्या बाजूच्या परिसरात संबधित विभागाकडून लिप्ट एरिगेशनचे पंप हॉऊस तयार करण्यात येत असून, या पंप हाऊसच्या मोकळ्या जागेत व इमारतीत अनेक मोठे वजनी साहीत्य एका कंपनीने आणून ठेवले असता,त्यापैकी २ इंजिन, ४ कंट्रोल युनिटस, ४ पॅकींग बॉक्स, ४ एअर व्हॉल्व, बोल्टस असा एकूण ६ लाख ६८ हजार ५७८ रुपयाचा मुददेमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली होती. फिर्यादीच्या तक्रारी वरुन भंडारा पोलिस स्टेशन येथे अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तक्रारीची दखल घेत भंडारा शहर पोलिस स्टेशने ठाणेदार सुभाष बारसे यांनी तपासाला गती देत, डिबीच्या पथकाने चोरी प्रकरणातील संशयीत असलेल्या पाच आरोपींना अटक करुन, गुन्ह्यात वापरलेली नंबर नसलेली नवीन मालवाहू टाटाएस गाडी, असा एकुण ५ लाख ३१ हजाराचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन, प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.