WARDHA ACCIDENTअज्ञात वाहनाच्या जबर धडकेत २१ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार - Apala Vidarbha LIVE

Breaking

Sunday, February 13, 2022

WARDHA ACCIDENTअज्ञात वाहनाच्या जबर धडकेत २१ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार


 वडनेर येथिल सिरसगाव आजनसरा चौरसत्यावर अज्ञात वाहनाच्या जबर धडकेत २१ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार

वर्धा नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील वडनेर येथिल सिरसगाव आजनसरा चौरसत्यावर भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार जबर धडक दिली या भिषण धडकेत २१ वर्षीय दुचाकीस्वार जागीच चिरडून ठार झाल्याची घटना आज शनिवारी १२ फेब्रुवारीला दुपारच्या सुमारास घडली असून मृत्यक युवकांचे नाव योगेश विनायक भोयर वय २१ वर्षं राहणार चिचमंडल तालुका मालेगाव जिल्हा यवतमाळ असे आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या सुमारास योगेश विनायक भोयर वय २१ वर्षं राहणार चिचमंडल तालुका मालेगाव जिल्हा यवतमाळ हा आपले दुचाकी क्रमांक एच एम २९ बि एन ५६२९ ने नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरुन डवलापुर वरुन चिचमंडला जात असतांना वडनेर येथिल सिरसगाव आजनसरा चौरसत्यावर भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार जबर धडक दिली हि धडक इतकी भिषण होती की योगेश या धडकेत वाहनाने चिरडून जागीच ठार झाला.यावेळी वाहन चालक आपले वाहन घेऊन पसार झाला. अपघाची माहिती मिळताच वडनेर पोलिस घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.यावेळी पोलिसांनी अज्ञात वाहनाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वडनेर पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी अमित नाईक, लश्र्मन केंद्रे,अजय वानखेडे करीत आहे.

Post Top Ad

-->