डोणगांव साठी अग्निशामक वाहनाची मागणी - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, February 4, 2022

डोणगांव साठी अग्निशामक वाहनाची मागणी


भारतीय जनता पार्टीची डोणगांव साठी अग्निशामक वाहनाची मागणी

भारतीय जनता पार्टीच्या वतीने डोणगावात अग्निशामक वाहन उपलब्ध करुन देण्याची मागणी मा.अर्जुनराव वानखेडे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा यांचे मागदर्शनाने व मा.सागरभाऊ बाजड युवा तालुका अध्यक्ष मेहकर यांच्या नेतृत्वात डोणगांव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक  यांना मागणी करण्यात आली आहे.डोणगाव ग्रामपंचायत हि बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून  लोकसंख्येच्या बाबतीत पण खूप मोठी ग्रामपंचायत आहे. परंतु अग्नीपासून सुरक्षेच्या दुर्ष्टीने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे डोणगावात कुठेही  आग लागली तर डोणगावसाठी तालुक्यावरुन अग्निशामक दलाचे वाहन बोलवावे लागते व ते येण्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे आग लागलाने ग्रामस्थाचे खूप मोठे नुकसान होते. या पूर्वीहि डोणगावात २ ते ३ वेळी गॅस सिलेंडर गळती मुळे अग्नीतांडव झाले आहे. परंतु सुदैवाने जीवित हानी झाली नाही परंतु भविष्यात अशी एखादी घटना पुन्हा घडणार नाही व त्यामध्ये गावातील निष्पाप ग्रामस्थाचा जीव जाणार नाही याची आपण शाश्वती घेऊ शकत नाही. त्यामुळे या मागणीची तत्काळ पूर्तता करावी व डोणगावसाठी अग्नीशामक वाहन किंवा कायमस्वरूपी पर्यायी  व्यवस्था उपलब्ध करून द्यावी असे निवेदनातुन म्हटले आहे.यावेळी विलास परमाळे शहर अध्यक्ष,सचिन गजेवार सामाजिक कार्यकर्ते,सचिन भारती,विष्णु श्रीनाथ ,अक्षय काळे,रोहीत डागर, उपस्थितीत होते.

Post Top Ad

-->