जमिनीत पुरुन ठेवलेली दारू जप्त
1 लक्ष 30 हजाराचा मुद्देमाल सह ४ लोकांवर कारवाई
गोंदिया ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मौजा आसोली येथील संघर्ष सुदेश गडपायले रा. आसोली हा शेतशिवारातील आपल्या शेतात अवैधरित्या हातभट्टीची दारू गाळतो अशी माहिती मिळाताच पोलिसांनी चार अड्यावर धाड टाकली असता रनिंग भट्टी, कच्ची दारू,
१ लक्ष ३० हजार ४०० रूपयांचा हात भट्टीसह मुद्येमाल जप्त करण्यात आला असुन आरोपींविरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.