गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्शीला बेशर्माचे झाडे व पुष्पहार घालुन निषेध
सतत गैरहजर राहत असल्याने वंचित ने केला निषेध
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याचा आरोप करत आज त्याच्या खुर्शीला बेशर्माचे झाडे व पुष्पहार घालुन वंचित बहूजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला.
गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी हे कार्यालयात सतत गैरहजर राहत असल्याने नागरिकांचे कामे खोळंबत आहेत,अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी अन्यथा लोकशाही पध्दतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा ही वंचित कडून देण्यात आला