गेवराई पोलीस स्टेशन हद्दीत भिषण आपघात
गेवराई तालुक्यातील सावळेश्वर येथे दि १६ रोजी रात्री अकरा च्या सुमारास ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअप ची जोरदार धडक झाली यामधे दोन जण जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन सावळेश्वर रोड वर रात्री अकरा च्या सुमारास उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व पिकअप ची जोरदार धडक झाल्याने अपघात झाला आहे. या अपघाता मध्ये आन्नासाहेब शामराज पाठक रा राक्षसभुवन ( वय वर्ष ३७ ) व त्यांचा मुलगा आर्यन ( वय १२ ) यांचा जागीच मृत्यू झाला . तर मुलगी मंजरी आन्नासाहेब पाठक ( वय ११ ) हिच्या सह इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे . जखमींना बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.घटने ची माहिती मिळताच गेवराई पोलीस स्टेशन चे पीएसआय बोडके यांच्या सह पोलीस कर्मचारी घटना स्थळी धाव घेऊन पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदना साठी गेवराई उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे