मेहकर तालुक्यातील मौजे शेलगाव देशमुख येथे भीम जयंती खूप उत्साहात, शांततेत पार पडली. समाजाच्या वतीने भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. कोरोना असल्यामुळे मागील 2 वर्ष कुठलीच जयंती साजरी करता आली नाही. परंतु आत्ता कोरोना चे निर्बंध उठवल्या मुळे, शासनाने परवानगी दिल्यामुळे कारोना नंतर ही पाहिली ची भीम जयंती होती. त्यामुळे एक आगळा वेगळा जोश भीम सैनिक कडून बघायला मिळाला. सर्व लहान मूल , स्त्री , पुरुष सर्वांनी बाबा साहेब यांच्या भव्य दिव्य मिरवणूकीचा आनंद घेतला. सर्व समाजातील लोकांनी भीम जयंती साजरी केली.
ग्रा.प.सदस्य विनोद गोरे यांनी लोकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था केली. आणि तसेच सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ कांबळे यांच्या कडून सर्वांना अल्पोहर , थंड सरबत देण्यात आले. नंतर बौद्ध विहारामध्ये सर्व महापुरुषांचे पूजन करून , पंचशील ग्रहण करून भीम जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन शुद्धोधन सदार यांनी केले. यावेळी सर्व समाज बांधव, महिला ,बाल बालक उपस्थित होते.