दिवसा ढवळ्या अवैध रेतीचा उपसा करून ट्रॅक्टरद्वारे केली जाते वाहतूक प्रशासन मुंग गिळून गप्प.
मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक शेत-शिवार मधील कांचन गंगा नदीपात्रातून नियमाला डावलुन मोठया प्रमाणावर अवैध रेती उपसा करून ढवळ्या दिवसा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाहतुक केल्या जात आहे.
तालुक्यातील अंजनी बुद्रुक लांडेवाडी परिसरातून कांचनगंगा नदीपात्रातून संजय घुगे यांच्या ट्रॅक्टरद्वारे ढवळ्या दिवसा अवैध रेतीचा उपसा करून आपल्या ट्रॅक्टरद्वारे दिवसा अवैध वाहतूक करत आहे तर अंजनी बुद्रुक डोणगाव परिसरातील काही ट्रॅक्टर अवैध वाहतुक करीत आहेत. सदर बाब महसूल प्रशासनाला माहित नाही का..असा प्रश्न आहे. मात्र याकडे महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन अर्थ पूर्व दुर्लक्ष केल्या जात आहे. तालुक्यातील नदीपात्रातून अनेक ठिकाणावरून अजुनही रात्रंदिवस अवैध रेतीची वाहतूक केल्या जात आहे. मात्र महसूल प्रशासन पोलीस प्रशासन व संबंधित प्रशासन मुंग गिळून गप्प बसलेले असल्याचे चित्र आहे. मात्र असेच जर चालू राहीले तर कायद्याचा धाक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे हे मात्र निश्चित झाले आहे