नियमित पुरेसा ब्लिचिंग साठा सर्व ग्रामपंचायतने ठेवावा - जि. प. मुकाअ भाग्यश्री विसपुते - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, June 10, 2023

नियमित पुरेसा ब्लिचिंग साठा सर्व ग्रामपंचायतने ठेवावा - जि. प. मुकाअ भाग्यश्री विसपुते


नियमित पुरेसा ब्लिचिंग साठा सर्व ग्रामपंचायतने ठेवावा - जि. प. मुकाअ भाग्यश्री विसपुते

30 जुन पर्यंत मान्सून पूर्व जलस्त्रोतांची तपासणी

बुलढाणा, यंदाच्या मान्सून मध्ये पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी मान्सूनपूर्व म्हणजेच 15 मे ते 30 जून पर्यंत जिल्ह्यातील सर्वच म्हणजे 10189 पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी होणार आहे. तसेच मान्सून कालावधीमध्ये कुठल्याही ग्रामपंचायतला साथरोग प्रादुर्भाव होवू नये यासाठी सर्व ग्रामपंचायत नियमित पुरेसा ब्लीचींग साठा आपल्या ग्रामपंचायतला उपलब्ध ठेवावा असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे.  
        दि. 15 मे ते 30 जुन पर्यत मान्सूनपूर्व रासायनिक पाणी नमुने तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने नळ पाणी पुरवठायोजना, शाळा, अंगणवाडी व तीन वैयक्तिक घराचे नळाचे पाणी नमूने रासायनिक तपासणीसाठी संबंधित प्रयोगशाळेला पोहच करायच्या आहेत. सोबतच गावातील ईतर पिण्याचे पाण्याचे स्त्रोतांची तपासणी करायाची आहे.
    बुलढाणा जिल्ह्यातील एकूण 10189 पाणी नमुन्याची रासायनिक तपासणी करून ऑनलाईन करण्याचे उद्दिष्ट आहे पैकी आजपर्यंत 7908 पाणी नमुने तपासणी होऊन ऑनलाईन झालेले आहेत. त्यामध्ये नळ पाणी पुरवठा योजना, शाळा, अंगणवाडी, घरगुती नळ व इतर अशा सर्व पाणी नमुन्याची रासायनिक तपासणी करायची असल्याने उर्वरित आणि नमुने तात्काळ 
 संबंधित प्रयोग शाळेला पाठवण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले आहे. तसेच पावसाळा जवळ येत आहे. आपल्या ग्रामपंचायतला साथरोगाचा प्रादुर्भाव होऊ नये याची काळजी घेण्यासाठी सर्वांनी पुरेशा प्रमाणात ब्लिचिंग पावडरचा साठा उपलब्ध ठेवावा असेही निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.
 त्या नंतर लगेचच जैविक पाणी नमुने तपासणी अभियान राबयाचे असून साथरोगाचे अनुषंगाने प्रत्येक पिण्याचे पाण्याचे स्रोताचे स्वच्छता सर्व्हेक्षण आरोग्य विभागाचे आरोग्य सेवक व पंचायत विभागाचे जलसुरक्षक दोघांचे समन्वयाने करण्यात येणार आहे.  
  सदर रासायनिक पाणी नमुने तपासणी चे अभियान यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग शिवशंकर भारसाकळे तसेच कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गटविकास अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे कर्मचारी, विस्तार अधिकारी आरोग्य, विस्तार अधिकारी पंचायत, गट संसाधन केंद्राचे कर्मचारी, ग्रामसेवक, आरोग्य सहाय्यक, जलसुरक्षक आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

Post Top Ad

-->