वडिलांच्या निधना नंतर घराची सर्व जवाबदारी अक्षय वरच होती.
कमी वयात मोठी जबाबदारी एकदमच आपल्यावर आल्याने अक्षय शेतातील तयारीला सुरुवात केली होती.तरुण शेतकरी अक्षय किसनराव देशमुख वय अंदाजे 20 ते 21 वर्षे हा आपल्या शेतात 9 जून रोजी 1 वाजताच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने नाली खोदून घेत होता अश्यात जेसीबी पलटी होऊन अक्षय त्याखाली दबून गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी नेतावेळेस त्याचा मृत्यू झाला.
मेहकर तालुक्यातील ग्राम उमरा देशमुख येथील अक्षय किसनराव देशमुख उल्पभूधारक शेतकरी असून घरातील सर्व जवाबदारी त्याच्यावरच होती अश्यात पावसाळ्याचे पाणी शेतात शिरून पिकाचे होणारे नुकसान पाहता अक्षयने जेसीबीच्या साहाय्याने बांधावर नाली खोदण्याचे काम सुरु केले अश्यात नाली खोदण्याचे काम सुरु असतांना अचानक जेसीबी पलटी झाली ज्यात अक्षय त्या खाली दबला
शेजारी शेतात असलेल्या लोकांनी माहीती गावात दिल्याने गावकारी जमा झाले त्या वेळी अक्षय बोलणाऱ्याच्या बोलण्याला प्रतिसाद देत होता त्यांच्याशी बोलत होता गावाकऱ्यानी शर्तीचे प्रयत्न केले मात्र अक्षय जेसीबीच्या खालून निघू शकला नाही अश्यात गावात चालणारी दुसरी जेसीबी बोलवण्यात आली आणि अक्षला जेसीबी खालून काढण्यास बराच वेळ गेला नंतर त्याला बाहेर काढण्यात आले मात्र त्याला बाहेर काढताच छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी नेत असतांना रस्त्यात अक्षयची प्राण ज्योत माळवली. विशेष म्हणजे गंभीर जखमी झाल्या नंतर सुद्धा अक्षय शेवट परियंत बोलत होता त्याला पाहता वाटत होते की मृत्यूला हरवेल मात्र नशिबाने त्याची साथ सोडली.
9 जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथून जवळच अक्षयची प्रांणज्योत मावळल्यानंतर तेथूनच गाडी परतवली त्या नंतर 10 जुनच्या सकाळी 10 वाजता दरम्यान त्याचे पीएम होऊन शोकाकुळ वातावरणात त्याच्यावर उमरा देशमुख येथे अंत्यविधी करण्यात आला 9 जुनच्या रात्रीच गावात अक्षयच्या मृत्युंची वार्ता पसरल्याने गावात चूल पेटली नाही.
( अक्षय देशमुख याच्या वडिलांचे 3 वर्षां पूर्वी मृत्यू झाला होता तर आईला अर्धांगवायू झाल्याने संपूर्ण कुटुंबाची जवाबदारी त्याच्यावर आली होती अश्यात मागील तीन वर्षां पासून घरी असलेली 2 एक्कर शेती मध्ये काबाड कष्ट करून तो आपली उपजीविका करत होता तर त्याने मागच्या वर्षी घरकुल बांधले होते या वर्षी बाजूचे दोन रूम बांधायच्या होत्या त्या साठी त्याने तयारी सुद्धा करून ठेवली होती, अक्षयला चार बहिणीचा तो एकुलता एक भाऊ होता. मात्र चार बहिणीचा भावांवर काळाच्या चक्रवर्ती मध्ये अटकला अखेर दुर्दैवी मृत्यू झाला)