शेगाव जिल्हा बुलढाणा येथून दर्शन घेऊन कन्हाळा तालुका परतुर येथील दांपत्ये गावाकडे येत असताना मंठा येथून जवळच असलेल्या तळणी-मंठा रोडवरील महावीर जिनिंग जवळ शेगाव पंढरपूर मार्गावर स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात होऊन गाडीत आग लागून सविता सोळंके यांचा आगेत होरपळून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की कऱ्हाळा तालुका परतुर येथील दांपत्य शेगाव येथून दर्शन घेऊन गावाकडे परत येत असताना सकाळी ४.४० मिनिटांनी मंठा शहरा जवळ असलेल्या शेगाव पंढरपूर महामार्गावरील महावीर जिनिंग लिंबोना पाटी समोर स्विफ्ट डिझायर एम एच २१ ऐ एक्स ७७५५ गाडीचा अपघात होऊन गाडी लॉक झाल्याने गाडीला आग लागून सविता सोळंके वय वर्ष ३३ रा. कन्हाळा तालुका परतुर यांचा जागीच मृत्यू झाला. असल्याची फिर्याद सोपान गंगाधर सोळंके याने दिल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय देशमुख, उपनिरीक्षक बलभीम राऊत, उपनिरीक्षक आसमान शिंदे, पोका शाम गायके, राजु राठोड होमगार्ड बालू राठोड यांनी घटना स्थळी धाव घेऊन सविता सोळंके यांना शवविच्छेदनासाठी मंठा ग्रामीण रुग्णालय मंठा येथे पाठवण्यात आले होते. या संदर्भात सोपान गंगाधर सोळंके यांच्या माहिती वरून मंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.