(APAlA VIDARBHA LIVE Network )
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव ते आरेगाव रस्त्यावर जवळा रस्ता जोडलेला असून दोन शाळा, कृषी उत्पन्न बाजार समिती,संत गजानन महाराज मंदिर, ओलांडेश्वर मंदिर व मोठी बाजारपेठ असे असतांना सुद्धा रस्ता पानंदन रस्त्या प्रमाणे 10 फुटाचा होतं आहे.
रस्ता 10 फुटाचा झाल्याने अतिक्रमण वाढणार. आधार कार्ड दाखवा 50 रुपये द्या आणि 8 किलो बियाणे घेऊन जा
डोणगाव मधून आरेगाव साठी जाणारा रस्ता डोणगाव आरेगाव रस्ता असून पुढे त्याला जवळा फाटा फुटतो अश्यात 24 तास रहादारी असणारा हा मार्ग असून या कृषी उत्पन्न बाजार समिती व बाजार पेठ असल्याने मोठ्या वाहणाची वर्दळ असते मात्र रस्ता होणार पानंदन रस्ता प्रमाणे फक्त 10 फुटाचा ज्याने भविष्यात खूप मोठ्या अडचणी निर्माण होणार तर रस्त्या लगत अतिक्रमण सुद्धा वाढणार.
डोणगाव ते आरेगाव रस्त्याच्या कामाला सुरवात झाली असून 4 किमी 800 मिटर रोड होणार असून त्याची अंदाजे किंमत 1 कोटी 4 लाख रुपये आहे अश्यात या रस्त्यावर 1 किमी पुढे जवळा फाटा जातो तर दोन शाळा, संत गजानन महाराज मंदिर, अटल खा नटल खा बाबा दर्गा, ओलांडेश्वर मंदिर, खंडोबा मंदिर, स्वामी समर्थ मंदिर,पशु वैद्यकीय दवाखाना,मोठी बाजारपेठ व मुख्य रहदारी असलेले कृषी उत्पन्न बाजार समिती असून ज्याने रस्त्यावर लहान मोठ्या वाहणाची वर्दळ असते अश्यात हा रस्ता किमान दोन वाहने जाण्या सारखा होणे अपेक्षित होते मात्र रस्त्याला मंजुरात मिळाली व कामाला सुरवात झाली तेव्हा हा रस्ता फक्त 3 मिटरचा होणार असल्याचे अभियांत्याने सांगितले ज्याने भविष्यात खूप मोठ्या अडचणी निर्माण होणार शेतातील पानंदन रस्त्या प्रमाणे हा रस्ता 10 फुटाचा बनत आहे.