(apala vidarbh live network)
मेहकर शहरातील मुस्लीम बांधवांनी आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद सणानिमीत्त कुर्बानी न करण्याचा निर्णय दि.26 सोमवार रोजी पोलीस स्टेशन मेहकर येथे आगामी बकरी ईद, आषाढी एकादशी या वेगवेगळया धर्माच्या लोकांचे एकत्रीत येणारे उत्सवाचे अनुषंगाने सामाजीक एकोपा राहावा याकरीता सुनिल कडासणे पोलीस अधिक्षक बुलडाणा बी.बी. महामुनी अप्पर पोलीस अधिक्षक बुलडाणा प्रदीप पाटील पोलीस उपअधिकारी मेहकर यांचे मार्गदर्शनाखाली निर्मला परदेशी पोलीस निरीक्षक पो.स्टे. मेहकर यांनी मेहकर शहरातील, मुस्लीम समाजातील प्रतिष्टीत नागरीक मस्जीद चे ट्रस्टी मौलवी यांची पोलीस स्टेशन मेहकर येथे मिंटीग आयोजीत करण्यात आली होती.
सदर मिंटीग मध्ये मेहकर शहरातील मुस्लीम बांधवांनी हिंदु बांधवांचा आषाढी एकादशी या महत्वाच्या सणा निमीत्त सामाजीक बांधीलकी म्हणुन राष्ट्रीय एकात्मता आणी बंधुत्व कायम राहण्यासाठी व सर्व धर्म समभावाची भावना वाढीस लागावी या दुष्टीने मेहकर शहरातील शांतता अबाधीत राहण्यासाठी आपले बकरी ईद सणानिमीत्त धार्मीक पंरपरेनुसार करण्यात येणारी कुर्बानी ही दुसरे दिवशी करण्यात येणार आहे. सामाजीक सलोखा व राष्ट्रीय एकता वाढीस लागण्याकरीता मेहकर येथील मुस्लीम समाजाच्या वतीने उचलेले हे मोठे पाउल असुन या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत
Tuesday, June 27, 2023
Post Top Ad
आम्ही आपला विदर्भ लाईव्ह या वाहीनीची निर्मिती केली जनसामान्यांची शक्ती एक केंद्रित झाली तर कोणतीही ताकद तिला अडवू शकत नाही त्यासाठीच या उपक्रमात आपली साथ आम्हाला मोलाची आहे सहभागी व्हा सहकार्य करा आणि ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीविषयी त्या गावाविषयी कृतज्ञ भाव ठेवून आमच्या वहिनीला तुमच्या सेवेची संधी द्या चला तर मग एक नवे क्षितीज. नव्हे एक नवे स्वप्न आपण मिळून पाहूया आपला विदर्भ लाईव्ह वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास आपला विदर्भाचा व देशाचा विकास हे ब्रिद वाक्या मनाशी बाळगून या उपक्रमाची एकजुटीने आपला विदर्भ लाईव्ह या वृत्तवाहिनीला आपले हक्काचे व्यासपीठ बनवूया...