बुलडाणा डोणगाव आषाडी एकादशी व बकरीद ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने तेव्हा आस्थेला पाहता बकरीद ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा निर्णय मुस्लिम समाजा कडून घेण्यात आला असून त्या निमित्य डोणगाव पोलीस स्टेशनंचे ठाणेदार यांना लेखी निवेदनद्वारे कळवले ज्याने डोणगाव येथील मुस्लिम समाजाने हम साथ साथ है असा संदेश दिला.
डोणगाव हा बुलढाणा जिल्हातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेला गाव असून येथे सर्व समाज बांधव गुण्या गोविंदाणे राहतात अश्यात कोणतेही सण त्योहार असो एकोप्याने साजरे होतात त्याला पाहता 29 जून रोजी बकरीद ईद व आषाडी एकादशी एकाच दिवशी येत असल्याने बकरीद म्हणजे कुर्बानी आली तर त्याच दिवशी हिंदू समाजात आस्थेचा असा उपवास असतो त्याने दोन्ही समाजात एकोपा रहावा धार्मिक भावना दुखावल्या जाऊनये यासाठी ठाणेदार निलेश अपसुंदे, पोलीस उप निरीक्षक राहुल चव्हाण, डोणगाव बिट जमादार सतीश मुळे, पो का शंकर तांबेकर यांनी विशेष प्रयत्न करून मुस्लिम समाजाची बैठक घेतली त्या बैठकीत सर्व समाजाने एक मुखाने कुबुल केले की हिंदू बांधवाची आस्था पाहता आम्ही कुर्बानी ही ईदच्या दुसऱ्या दिवशी देऊ ज्या संबंधी एक निवेदन ठाणेदार निलेश अपसुंदे यांना देऊन संदेश देण्यात आला की हम साथ साथ है. कुर्बानी ईदच्या दुसऱ्या दिवशी करू हा निवेदन देता वेळेस जमील पठाण, बशीर शाह, अब्रार मिल्ली,सलीम शाह,यासिन बेग, हमीद मुल्लाजी, संजू खान, यासिन कुरेशी,वसिम खान,शे शपिक आदी हजर होते.