स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेवून त्यांना धीर दिला.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन गृहातील मृतदेह बघून मन विचलित झाले. डोळ्याला न बघवणारे हे चित्र होते. यावेळी रविकांतभाऊंनी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्रीजी विसपुते व इतर अधिकाऱ्यांशी या घटनेबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी माध्यमांशी संवाद साधतांना रविकांत तुपकर म्हणाले की, या घटनेचे आम्ही राजकारण करू इच्छित नाही पण समृद्धी महामार्गावर वारंवार अपघात का होतात, याची कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. समृद्धी महामार्गावर सोयी-सुविधा उभारण्यासाठीचे टेंडर-वर्क ऑर्डर का रखडली आहे..? सोयी-सुविधांशिवाय महामार्ग सुरू करण्याची घाई का केली..? पाच लाख रुपयांची मदत देऊन लोकांचा गेलेला जीव परत येणार आहे का..? असे गंभीर प्रश्न आम्हाला पडले आहेत.
समृद्धी महामार्गावर डांबरचा लेअर व काही विशिष्ट अंतरावर सर्व सोयी-सुविधा (रेस्ट रूम, वॉशरूम, हॉटेल, गॅरेज, पेट्रोल पंप) तातडीने उभारण्यात याव्या, अशी मागणी रविकांतभाऊ तुपकर यांनी यावेळी केली.