विद्युत पोलच्या तनाव्याला पर्श होऊन म्हशीचा मृत्यू शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील रामदास लक्ष्मण बोरकर यांच्या म्हशीला विजेचा करंट लागून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे
डोणगाव येथील बालाजी नगर जवळा फाटा वाड क्र 2 येथील रहिवाशी असलेले बोरकर यांच्या मालकीची म्हैस सकाळी गोठ्यातून दुध काढल्या नंतर बाहेर बांधण्या करिता नेत असतांना घरासोमोरील विद्युत पोल (खांब) च्या तणावाला स्पर्श झाल्यामुळे म्हशीचा जागेवरच मृत्यू झाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला कळवण्यात आले होते सदर घटना स्थळी विद्युत विभागाचे कर्मचारी दिसून आले. घटनेची वृत्तलेपर्यंत पोलिसात नोंद नव्हती.
विशेष
ले आऊट मध्ये चुकीच्या पद्धतीने विद्युत पोल असल्याचे दिसून आले चक्क घरावूनच तारा गेलेले आहेत आणि या विद्युत पोलचे तनावे हे रस्त्यामध्ये असल्यामुळे या पोलच्या तनाव्याला स्पर्श होतो आणि याच स्पर्शमुळे झालेली घटनेहून लक्षात येते की किती भयंकर ही घटना असू शकते संबंधित ले आऊट मध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांनी या पोलचा व घरावरून गेलेल्या तारांचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यामुळे लेआउट मधील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सदर लेआउट धारकावर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असून संबंधित घरावरची तारे काढने तेवढेच गरजेचे असल्याचे दिसून आले. हे विशेष