MP खासदार प्रतापराव जाधवबुलडाणा लोकसभा मतदारसंघातील जळगाव जामोद,संग्रामपूर,शेंगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे प्रंचड प्रमाणात शेतपिकांचे नुकसान झाले आहे आज शिवसेना नेते खासदार प्रतापरावजी जाधव यांनी संग्रामपुर तालुक्यातील मौजे सोनाळा,बावनवीर,पंचाळा,एकलारा,काथरगांव पिंप्री,इत्यादी गांवाना प्रत्यक्ष भेट देवून आढावा घेतला आणि जिल्हा प्रशासनाला सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सध्याच्या सरकारने एनडीआरएफ पेक्षा तीन पट मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार च संग्रामपूर जळगाव तालुक्यातील आपद ग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे.तसेच या परिसरातील सर्व लहान मोठ्या नदी नाल्यांचे खोलीकरण करणे आवश्यक असून यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले आहे.
यावेळी त्यांनी एकलारा बानोदा येथील मृतक शेतकरी मदन धुळे यांच्या कुटुंबीयांची त्यांचे घरी जाऊन सांत्वन पर भेट घेवून सांत्वन केले बेघर झालेल्या कुटुंबाशी संवाद साधून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
काल झालेल्या अतिवृष्टी संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणे झाले असून बेघर व बाधित कुटुंबांना दोन दिवसात आर्थिक मदत देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
ज्यांची घरे वाहून गेली त्यांना आणखी कशी मदत करता येईल यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करू या तालुक्यातील बहुतांश सर्वच लहान मोठे नदी नाले खूपच उथळ झाले आहेत त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसते म्हणून नाल्यांचे खोलीकरण करणे फारच गरजेचे आहे. या कामाचा कृती आराखडा तयार करून सर्वच नदी नाल्यांचे खोलीकरण व सरळीकरण करू सातपुडा पर्वत व पूर्णा नदी यातील अंतर कमी असल्याने पर्वतावरून उतरणाऱ्या पाण्याला स्पीड असतो त्यामुळे पुराचे पाणी शेतात घुसते व शेती खरडून जाते पण खोलीकरण केल्याने ही समस्या कायमची दूर होऊ शकते यासाठी प्रयत्न करू असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितले आहे.

उद्या २४ जुलै सोमवारी संग्रामपूर तालुक्यातील काही उर्वरीत गावाची पाहणी करून खासदार प्रतापराव जाधव जळगाव जामोद तालुक्याचा पाहणी दौरा करणार आहेत यावेळी ते आपदग्रस्तांशी संवाद करतील.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाणे उपजिल्हाप्रमुख राहुल मारोडे,राजेंद्र मिरगे,शिवसेना तालुकाप्रमुख केशव ढोकणे,रामा थारकर,अजय पारस्कर, संतोष लिप्ते,भाजपा तालुका अध्यक्ष लोकेश राठी,ज्येष्ठ नेते राजेंद्र ठाकरे,जानराव देशमुख,युवासेनेचे मा.उमेश शेळके,बावनबीर सरपंच गजानन मनसुटे,सोनाळा सरपंच सतीश खंडेलवाल रिंगणवाडी सरपंच रवींद्र रावणकार उमेश शेळके रवी लव्हाळे श्याम आकोटकर,यांच्या सह मा.तहसीलदार मा.कृषी विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक,मंडळ अधिकारी व शिवसेना युवासेना प्रमुख पदाधिकारी,शेतकरी बांधव उपस्थित होते.