Buldana,टिप्परच्या जबरदस्त धडकेत दोन जण Thara ठार - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, July 3, 2023

Buldana,टिप्परच्या जबरदस्त धडकेत दोन जण Thara ठार


                         टिप्परच्या धडके दांपत्य ठार  (APALA VIDARBH LIVE NETWORK)

बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव पासून जवळच असलेल्या लोणी गवळी ते जानेफळ रस्त्यावर घडली घटना भरधाव टिप्परने दिलेल्या धडकेत दाम्पत्य ठार झाले.

ही घटना ३ जुलै रोजी सकाळी १० वाजता दरम्यान लोणीगवळी ते जानेफळ रस्त्यावर.घडली. देविदास पवार  व इंदुबाई देविदास पवार  रा. मोहना ता. मेहकर) अशी मृतांची नावे आहेत.

मोहना येथील देविदास पवार व त्यांची पत्नी इंदुबाई पवार हे दुचाकी क्र. एमएच २८ बीडी ७६१९ ने विश्वी येथील नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनासाठी जात असल्याची माहिती आहे. दरम्यान, मागून भरधाव येत असलेल्या टिप्पर क्रमांक एमएच २८ बीबी ५७२२ ने त्यांच्या दुचाकीस जबर धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झाला. अपघातानंतर टिप्पर चालकाने पळ काढला, अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशन   अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली यांनी तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथील शवागारात पाठविण्यात आले आहेत. सदर दोन्ही वाहने डोणगाव पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले आहे पुढील तपास पोलीस करत आहे 

Post Top Ad

-->