बुलडाणा जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या नागरिकांना मोफत औषध वाटप
जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेले डोणगाव येथील डोणगाव अर्बन CO.OP.CREDET सोसायटीनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्याकडे समाजाचे सुद्धा काही देणे आहे या दृष्टिकोनातून डोणगाव अर्बन ने पूरग्रस्तांच्या मदतीला सरसावली
झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्त हे अनेक समस्यांनी ग्रस्त असलेल्या मुळे व यातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे आपले आरोग्य हे कायम समस्या मुक्त राहावे ही बाब लक्षात घेत डोणगाव अर्बनचे युवा अध्यक्ष ऋषांक चव्हाण यांनी वैद्यकीय उपचारासाठी औषध मोफत देण्याच्या संकल्पनेतून युवा अध्यक्ष ऋषांक चव्हाण यांनी सामाजिक बांधिलकी दर्शवली असून वैद्यकीय कॅम्पमध्ये पूरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी म्हणून होईल तेवढे मोफत औषध आज त्या वैद्यकीय Camp Chya आयोजनातून वाटप करण्यात आले या उपक्रमामुळे डोणगाव अर्बन चे डोणगावकरांकडून कौतुक केल्या जात आहे.
जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यांतील काही गावांत ढगफुटी झाली. या पावसाने सर्वत्र हाहाकार झाला. या महापुराने जवळपास लाखों हेक्टर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. 200 च्यावर गुरे दगावली आहेत. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. याव्यतिरिक्त कित्येकांच्या भिंती खचल्या, घरातले अन्नधान्य, स्वयंपाकाची भांडी, कपडे सगळं काही पुराने वाहून गेले आहे.
या दोन तालुक्यात पूराने मागील अनेक वर्षांचे रेकॉर्ड तोडले असुन यात हजारोंचे संसार आता चिखलात फसले आहेत. नुकसानग्रस्त भागात आपलेच समाजबांधव राहतात या नात्याने त्यांना सहकार्य करणे ही आपली नैतिक जबाबदारी म्हणून डोणगाव अर्बन च्या युवा अध्यक्ष ऋषांक चव्हाण यांनी पुढाकार घेत जमेल तेवढे मोफत औषध वाटप केले. या उपक्रमामध्ये डोणगाव परिवारांचे बरेच मान्यवर उपस्थित राहून त्या ठिकाणी औषध वाटप करण्यात आले...