साथीच्या रोगांचा मेहकरला विळखा
तालुक्यात संसर्गजन्य साथीमुळे डोळ्यांचे
मेहकर विकार गेल्या काही दिवसांपासून मेहकर तालुक्यातील शहरांसह डोणगांव गाव व परिसरातील गावांमध्ये डोळे येण्याच्या साथी रोगाचा प्रसार वाढला असून नागरिक हैराण झाले आहेत, हा संसर्गजन्य आजार असल्याने एकमेकाकडे पाहण्यामुळे किंवा संपर्कामुळे हा आजार होत आहे
डोळे आल्यानंतर डोळ्यातून चिकट द्रव ओघळतो. डोळे लाल होऊन जोरात चुरचुरतात. तसेच त्यामुळे डोकेही दुखते. परिसरातील अनेक शालेय विद्यार्थ्यांना या आजाराचा प्रादुर्भाव झाला असून त्यामुळे शाळेच्या उपस्थितीवरही परिणाम झाला आहे. अनेक विद्यार्थी काळ्या रंगाचे चष्मे वापरुन शाळेमध्ये येत असून काही विद्यार्थी घरी राहणेच पसंत करत आहेत.तालुक्यामध्ये डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव या पुढील काळातही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे मा. जिल्हा परिषद कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेचे अमोल धोटे यांनी डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र चे वैद्यकीय अधिकारी अमोल गवई यांच्याशी साथीचे रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांन करिता योग्य ती खबरदारी घेण्याकरिता वैद्यकीय अधिकारी अमोल गवई यांच्याशी संवाद साधला त्यावेळी वैदिक अधिकारी अमोल गवई यांनी साथीच्या रोगावर योग्य ती उपाययोजना व खबरदारी प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगावच्या स्तरावरून घेतल्या जाईल व वरिष्ठ अधिकाऱ्यांना संदर्भित संसर्गजन्य साथीच्या रोगाची गांभीरता सांगून योग्य तो औषध पुरवठा ग्रामीण भागाकरिता उपलब्ध करून घेतल्या जाईल अशी माहिती यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी दिली आहे तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीच्या आजारांमध्ये चिकनगुनिया डेंगू मलेरिया यांसारखे आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा त्या आजारांवर देखील योग्य ती खबरदारी व उपायोजना करण्याकरिता शिवसेनेचे अमोल धोटे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव वैद्यकीय अधिकारी अमोल गवई यांना निवेदन दिले आहे यावेळी शिवसेनेचे विजय गोरे निलेश सदावर्ते व मनोज गिरी हे या ठिकाणी उपस्थित होते