आमदार संजय गायकवाड कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी या कर्मचाऱ्यांना पगारवाढ व कायम करण्याची मागणी
बुलढाणा बुलढाणा मोताळा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार संजय गायकवाड यांनी काल पावसाळी अधिवेशनामध्ये पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार वाढ द्या तसेच ज्यांची दहा वर्षे सेवा पूर्ण झाली त्यांना सेवेत कायम करण्याबाबत मागणी केली आहे.
बुलढाणा मोताळा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदारसंजय गायकवाड यांनी काल 25 जुलै रोजी पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभा सभागृहांमध्ये जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन विभागाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी या कंत्राटी कर्मचाऱ्यांची विधानसभेत बाजू मांडली. हे कंत्राटी कर्मचारी सुमारे पंधरा ते वीस वर्षापासून Buldhana-:MLA संजय गायकवाड यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विषयी विधानपरिषदेत मांडला PRSHNA..VIDEO
अत्यल्प मानधनावर काम करत आहेत. त्यांना इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा, सुविधा नसतात व त्यांना कुठली ही कामाची सुरक्षितता व शाश्वती नाही. यातील बहुतांश जणांचे स्पर्धा परीक्षाचे वयही आता निघून गेलेले आहे. या सर्वांचा उमेदीचा काळ हे अभियान यशस्वी करण्यासाठी गेला आहे. याचे फलित म्हणून बऱ्याच स्पर्धांमध्ये, अभियानामध्ये, उपक्रमांमध्ये महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी राहिलेले आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची व भविष्याची सुरक्षितता नाही. या सगळ्या समस्या कंत्राटी कर्मचारी यांनी संजूभाऊ गायकवाड यांच्याकडे मांडल्या होत्या. त्या सर्व समजून घेऊन संजय गायकवाड यांनी काल विधानसभा सभागृहामध्ये या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तात्काळ या कर्मचाऱ्यांचे पगारवाढ करावा तसेच ज्यांना दहा वर्षे झाले त्यांना नायमित सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली आहे. यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे. लवकरच या मागण्या मान्य करून घेणार असल्याचे संजय गायकवाड यांनी या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सांगितलेले आहे. तसेच कोविड कालावधीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना सानुग्रह अनुदान मिळावे यासह अनेक मुद्दे त्यांनी सभागृहात उपस्थित केले.यासाठी आमदार स्वीय सहायक श्री संतोष शिंगणे यांनी मोलाचे सहकार्य केले